निवडणुकीच्या रिंगणात क्रीडापटूंना संमिश्र यश!

लोकसभा निवडणुकीच्या रणागंणात यंदा क्रीडापटूंनीसुद्धा आपले नशीब आजमावले. यामध्ये क्रिकेटपटूंनी प्रामुख्याने दणदणीत यश संपादन केले, तर अन्य क्रीडापटूंच्या पदरी मात्र निराशा पडली.
निवडणुकीच्या रिंगणात क्रीडापटूंना संमिश्र यश!
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणागंणात यंदा क्रीडापटूंनीसुद्धा आपले नशीब आजमावले. यामध्ये क्रिकेटपटूंनी प्रामुख्याने दणदणीत यश संपादन केले, तर अन्य क्रीडापटूंच्या पदरी मात्र निराशा पडली.

भारताचा माजी अष्टपैलू युसूफ पठाणने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसकडून बहरामपूर येथे निवडणूक लढवली. काँग्रेसच्या अधिर रंजनविरोधात पठाणने ६० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने दमदार विजय नोंदवला. त्याचा भाऊ इरफान पठाणनेसुद्धा याविषयी त्याचे अभिनंदन केले. त्याशिवाय १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील किर्ती आझाद यांनी दुर्गापूर विभागातून निवडणूक लढवताना जवळपास १ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्याविरोधात भाजपचे दिलीप घोष होते.

पॅरालिम्पिकपटू देवेंद्र झझारियाला मात्र राजस्थानमध्ये भाजपकडून निवडणूक लढवताना पराभव पत्करावा लागला. भालाफेकपटू देवेंद्रला काँग्रेसच्या राहुल कसवान यांनी ७० हजार मतांनी पराभूत केले. तसेच माजी हॉकीपटू दिलीप कुमार तिर्की यांना ओदिशा येथे बिजू जनता दलाकडून निवडणूक लढवताना भाजपच्या जुआल ओराम यांनी धूळ चारली.

logo
marathi.freepressjournal.in