स्टॅलिन, खरगेंच्या अडचणी वाढणार ? सनातन धर्माबाबत वक्तव्य केल्याने तक्रार दाखल

अधिवक्ता अ‍ॅड. राम सिंग लोधी अधिवक्ता हर्ष गुप्ता यांनी एसपींकडे एका पत्राच्या माध्यामातून तक्रार केली आहे.
स्टॅलिन, खरगेंच्या अडचणी वाढणार ? सनातन धर्माबाबत वक्तव्य केल्याने तक्रार दाखल

सनातन धर्माबाबतच्या वादातून पुन्हा एकदा वादग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिवक्ता अ‍ॅड. राम सिंग लोधी अधिवक्ता हर्ष गुप्ता यांनी एसपींकडे एका पत्राच्या माध्यामातून तक्रार केली आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा आणि कर्नाटक सरकारमधील ग्रामीण आणि पंचायती राज मंत्री प्रियांक खरगे यांनी सनातन धर्मावर भाष्य केलं होत. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचं आवाहन केल्याने आणि खरगे यांच्यावर वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम १५३A,२९५A अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवारी सनातन निर्मुलन कार्यक्रमात बोलताना तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, "सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्याविरोधात आहे. त्यामुळं काही गोष्टींना आपण विरोध न करता तो नष्टच केला पाहिजे. आपण डेंग्यू, मलेरिया, मच्छर आणि कोरोनाला कधी विरोध करु शकत नाही, या गोष्टी संपवाव्याच लागतात". त्यांच्या या वक्तव्याने सगळीकडे खळबळ उडाली होती. या प्रकरणी राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in