सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा संपर्क यात्रेला दांडी ; नाराज असल्याच्या चर्चांना उधान

मागच्या काही महिन्यात भाजपात बाहेरून आलेल्या नेत्यांचे जास्त लाड पुरवले जात असल्याने घरच्या लोकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा संपर्क यात्रेला दांडी ; नाराज असल्याच्या चर्चांना उधान

आजपासून भाजपच्या लोकसभा संपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूरमधून या यात्रेला सुरुवात झाली. मात्र, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंडीवार यांची या यात्रेला उपस्थिती नव्हती. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चां सुरु झाल्याआहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. याच जिल्ह्यातून भाजपच्या लोकसभा संपर्क यात्रेला सुरुवात होत असल्याने त्यांची या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांच्यामुळे यात्रेच्या तारखेत बदल देखील करण्यात आला होता. तरीदेखील ते या यात्रेला उपस्थित राहीले नाहीत.

मुनगंटीवार यांनी या यात्रेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं होतं. सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यांच्या नाराजीमागे काही राजकीय संदेश आहे का? याबाबत देखील तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. आज चंद्रपूरच्या सर्व सर्व विधानसभा मतदार संघात भाजपची लोकसभा संपर्क यात्रा निघणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ झाला.

मागच्या काही महिन्यात भाजपात बाहेरून आलेल्या नेत्यांचे जास्त लाड पुरवले जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे घरच्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या चर्चा देखील दबक्या आवाजात सुरु आहेत.अशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यावर कॅगने ओढलेले ताशेरे आणि आज सुधीर मुनगंटीवार यांनी यात्रेला मारलेली दांडी यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in