"ना मला शिंदेसोबतची भाजपा आवडते ना पवारांसोबतची?" सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुनगंटीवार यांनी दिलेलं उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
"ना मला शिंदेसोबतची भाजपा आवडते ना पवारांसोबतची?" सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपला साथ दिली आणि महाराष्ट्रत सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर लगेच वर्षभराने राष्ट्रवादीत देखील फुट पडून अजित पवार यांनी भाजप प्रणित शिंदे सरकारला पाठिंबा देत सत्तेत सामिल होण्याच निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांचा गट सत्तेत सामिल झाल्याने भाजपची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुनगंटीवार यांनी दिलेलं उत्तराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठं भगदाडं पाडलं. यानंतर ते भाजपच्या मदतीने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानवं लागलं. यानंतर वर्षभराने अजित पवार यांनी देखील बंडखोरी करत सत्तेत सामिल होण्याच निर्णय घेतला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका गटाची ताकद भाजपसोबत जोडली गेली.

शिंदेंसोबतची भाजपा आवडते की पवारांसोबतची भाजपा आवडते? असा प्रश्न भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मला शिंदे सोबतची भाजपा आवडत नाही. आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो." मुनगंटीवार यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in