सद्य परिस्थितीवर सुप्रिया सुळे भावूक ; खंत व्यक्त करत म्हणाल्या, "असा दिवस येईल असं...."

मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले असल्याचं त्या म्हणाल्या.
सद्य परिस्थितीवर सुप्रिया सुळे भावूक ; खंत व्यक्त करत म्हणाल्या, "असा दिवस येईल असं...."

मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले आहे. मी राजकारणात कोर्टबाजीसाठी आलेली नाही. मी सर्वसामान्यांची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले आहे. मला वाटलं नव्हतं असा दिवस येईल. पण, सत्यासाठी जे काह कराव लागेल, ते आम्ही करु. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राज्याच्या जनतेच्या प्रेमासाठी आम्ही येथे आहोत. असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेली सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यांना चांगलंच झापलं. अध्यक्ष निर्देशांचं पालन करत नाहीत. पुढील दोन महिन्यात याबाबत निकाल द्यावा. अशी टीप्पणी कोर्टाने केल्याचं सांगण्याच येत आहे. या सुनावणीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे प्रकरण न्यायालयात असून अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ठाकरे आणि शरद पवार गटाची याचिका एकत्र करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. ही नैतिकतेची लढाई आहे. व्यक्तीगतद लढाई नाही. सत्य आणि असत्यातील ही लढाई आहे. शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ही लढाई जनतेची आहे. असं सुळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in