सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन ; "म्हणाल्या..."

उद्या त्यांचा वाढदिवसानिमित्ताने त्यांनी हे आवाहन केलं आहे
सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन ; "म्हणाल्या..."

खासदार सुप्रिया सुळे यांची नुकतीच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. उद्या सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ट्विट करत आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझ कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांप्रती असणारा जिव्हाळा व अस्था नेहमीच व्यक्त होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, उद्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक भेटून आपल्या शुभेच्छा देण्यासाठी मला उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे.

या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना नम्रपणे आवाहन केलं आहे. वाढदिसानिमित्ताने शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या परिसरातील गरजू शाळकरी मुलांना पुस्तकं, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदी वाटप करण्याचं आवाहन सुळे यांनी केलं आहे. तसंच या वस्तू वाटप केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करावे. मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवरून शेअर करेल, असं देखील त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी आपला पक्ष नेहमीच समाजाप्रतिची बांधिलकी जपत आला असल्याचं म्हणत आपण गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम नेहमीच्या तत्परतेने राबवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसंच हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट ठरेल. असं देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in