अजित पवारांबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, "हा त्यांचा वैयक्तिक..."

बारामतीच्या सभेत अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं होते.
अजित पवारांबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, "हा त्यांचा वैयक्तिक..."
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पक्षांतर्गत कलह वाढले असून अनेकांनी आपले वेगळी वाट निवडली आहे. शिवसेनेत झालेल्या संघर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूड पडली आहे. यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष चांगलाच सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळत आहे. कर्तज येथील शिबिरात अजित पवार यांनी हे सुतोवाच केलं आहे. या दोन दिवसीय शिबीरात त्यांनी बारामती, सातारा, शिरुर, रायगड लोकसभा लढवणार, असल्याचं स्पष्ट सांगितले आहे.

बारामतीच्या सभेत अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर प्रेम करणारी मी एक सामान्य नागरीक आहे. एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे. हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. बारामतीत लढण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाचं मी स्वागत करते. मात्र कोण जिंकेल ते जनता ठरवेल, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार भाजपसोबत जाण्याची जी देवगिरीवर बैठक झाली होती. त्या बैठकीत सुप्रिया सुळे होत्या. त्यांच्या साक्षीने चर्चा झाली आणि त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली होती. २ जुलै रोजी बैठक झाली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी बैठकीला नव्हते. मी गेटक्रश केलं होतं. मी गेले होते. माझ्या भावाचं घर आहे. मी जाऊ शकते. मी चर्चेत नव्हते. मी विचारलं पण मला कुणीच काही सांगितलं नाही. त्यांच्यात बेसिक चर्चा झाली होती. तुम्ही प्रस्ताव द्या, मी बाबांशी बोलते, असं मी सांगितल होत. मात्र भाजपसोबत जाण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती.

अजित पवार यांनी म्हटलं होते की, मुलांपेक्षा मुली वशांचा दिवा असतात, असं काही जणांनाच वाटतं. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो प्रत्येकाचाच वयैक्तिक अधिकार आहे. कुणाला काय वाटतं. सावित्रीबाई फुले यांनी मला शिक्षणाचा अधिकार दिला. मोदी साहेंबानी महिला आरक्षणाचे बिल आणलं. शरद पवार आणि राजीव गांधी यांनी ५० टक्के आरक्षण दिलं आहे, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in