सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या ; म्हणाल्या, "तुम्ही धमकी..."

मुंबई पोलिसांनी ललित पाटील यांना अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वांच तोंड बंद होणार, अशी प्रतिक्रिया दिली होती.
सुषमा अंधारे  फडणवीसांवर संतापल्या ; म्हणाल्या, "तुम्ही धमकी..."

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषणा अंधारे यांनी राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांची ललित पाटीलची आणि पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अंधारे यांनी केली होती. काल मुंबई पोलिसांनी ललित पाटील यांना अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वांच तोंड बंद होणार, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारे म्हणाल्या की, "तोंड बंद करणार म्हणजे का? संपून टाकाल? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवलं तसं अडकवाल? देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाहीत तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. जो कोणी ड्र्ग्जच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत रहावं, अशी धमकी तुम्ही देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस पळालो नाही तर मला पळवलं, असं का म्हणतो याचा शोध घ्या."

त्या पुढे म्हणाल्या की, "माझ्याकडील सर्व पुरावे मी माध्यमांसमोर ठेवले आहरेत. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेणे तपास करावा, अशी मागणी मी केली आहे. दादा भुसे यांनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दाखवल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करते. पण शंभूराज देसाई एवढे का चिडले? राज्य शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई नापास झाले. ड्रग्ज कारखाना उभा राहतो आणि तुम्हाला माहिती नाही तर तुमचं अपयश आहे", असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in