सुषमा अंधारेंची सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका ; म्हणाल्या...

सुषमा अधारे म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस आहेत. ते आरएसएसचे कळसुत्री बाहुली आहेत. त्यांना...
सुषमा अंधारेंची सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका ; म्हणाल्या...

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या नेहमी सत्ताधारी पक्षावर हल्लोबोल करत असतात. आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख "पपेट ऑफ आरएसएस" असा केला आहे. सुषमा अधारे म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस आहेत. ते आरएसएसचे कळसुत्री बाहुली आहेत. गोळवलकरांना महापुरुषांच्या यादीत आणूस बसवायचं आहे", अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटलं, तेव्हा भाजपचे बावनकुळे, शेलार, लाड तुटून पडायचे. मात्र, आता महापुरुषांचा अपमान होत असताना ते कुठे आहेत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. पुठे बोलताना त्या म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांचं कौतूक करण म्हणजे उंदराला मांजरीची साक्ष असं आहे. हेच मुख्यमंत्री भाजपसोबत राहु शकत नाही म्हणायचे, एक एक उद्योग बाहेर गेला म्हणून अजित पवार टीका करायचे. तेच अजित पवार आता कौतूक करताना दिसत आहेत" असं त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि स्मृती इराणी यांच्यावर देखील टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हटल्यावरुन त्या म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे यांनी हनुमार चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का? हनुमान चालीसा मलाही येते. तसंच त्यांनी शिरसाट, बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार यांच्यावर टिका तकर यांचं एकचं क्वालीफिकेशन आहे उर्मटपणा. ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत" अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली.

केंद्री मंत्री स्मृती इरामी यांच्याविषयी बोलता त्या म्हणाल्या की, इराणी या सोयीस्कर राजकारण करतात. निर्भया प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना साळीचोळीला आहेर पाठवणाऱ्या स्मृती इराणी या आता मणिपूर प्रकरणावर पाठवणार का? त्या धमक दाखवणार का? त्यांनी प्रसिद्धी हवी असते म्हणून त्या सोयीस्कर बोलत असतात. अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in