सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाल्या, "गृहमंत्री म्हणून..."

सुषमा अंधारे यांनी पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबवून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला होता
सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाल्या, "गृहमंत्री म्हणून..."

देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून नापास झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबवून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण झालं. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सखोल चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत पोलिसांच्या गाडीतून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला. उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी पुन्हा थांबली पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली, असं म्हणत सुषमा अंधारेंनीा फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान,अंधारे यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यावर याता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

फडणवीसांनी सखोल चौकशी करणार असल्याच्या प्रतिक्रियेवर सुषमा अंधारे म्हणाल्या, यावर खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन चालणार नाही. तर हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिवार्दाने घडला. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये देखील त्यांनी ससूनचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नेमणूक रद्द करण्यात आली. मात्र, ही सरकारची खेळी असून सरकार या प्रकरणात अनेकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारे केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in