राणांना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी, सुषमा अंधारे अमरावती लोकसभा लढवणार?

गेली अनेक वर्षे शिवसेनेची पकड असलेल्या अमरावती लोकसभेवर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे.
राणांना शह देण्यासाठी ठाकरेंची खेळी, सुषमा अंधारे अमरावती लोकसभा लढवणार?

राणा दाम्पत्य नेहमीत उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटावर तोंडसुख घेण्याची एकही संध सोडत नाही. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसेचा मुद्दा असो वा अन्य, ठाकरे गडावर नेहमी निशाणा साधला आहे. सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या अमरावती लोकसभा निडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नवनीत राणा यांना शह देण्यासाठी ठाकरे गट नवी खेळण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. अमरावती लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळाल्यास नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीला येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गेली अनेक वर्षे शिवसेनेची पकड असलेल्या अमरावती लोकसभेवर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याची माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारेंना अमरावती मतदार संघातून उमेदावारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अमरावती हा शिवसेनेचा गड मानला जात होता. 1999 पासून ते 2019 पर्यंत सलग 20 वर्षे शिवसेने अमरावती लोकसभेचे नेतृत्व केले आहे. आनंतराव गुढे आणि आनंदराव अढसूळ यांनी प्रत्येकी दोन वेळा अमरावती लोकसभेचे नेतृत्व केले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. निवडून आल्यानंतर राणा यांनी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदेगटाची वाट धरल्याने ठाकरे गटाकडून अमरावतीत नव्या उमेदवाराचा शोध सुरु आहे.

शिवगर्जना अभियानांतर्गत सुषमा अंधारे यांनी अमरावती जिल्ह्यात सभा घेतल्या. यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्याला थेट हात घातला होता. अनेक मुलींचे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबीत आहेत. त्यांना नोकरीच्या संधी नाकारल्या जात आहेत. मात्र, नवनीत राणा खोटे जात प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवून निवडून येतात आणि आपला कार्यकाळ पुर्ण करत आहेत. त्या या प्रकरणी का बोलत नाहीत? तसेच या प्रकरणाचा धडाडीने निकाल का लागत नाही? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in