खरं तर 'तो' साप संजय राऊत यांच्या तोंडाला चावायला हवा होता - भरत गोगावले

संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाल्याने सर्वत्र धावपळ उडाली. राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच हा प्रकार घडला
खरं तर 'तो' साप संजय राऊत यांच्या तोंडाला चावायला हवा होता - भरत गोगावले

संजय राऊत आणि सकाळची पत्रकार परिषद हे समीकरण ठरलेलं आहे. आज संजय राऊत पत्रकारपरिषद सुरु असताना एक धक्कायादक प्रकार घडला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाल्याने सर्वत्र धावपळ उडाली. राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच हा प्रकार घडला. यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील आल्या. यात शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी देखील यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

"संजय राऊत यांच्या तोंडाला साप चावायला हवा होता. तो त्यासाठीच निघाला असेल. ते खूप बोलतात त्यामुळेचं असं व्हायला हवं होतं त्यांच्या घरात निघालेला साप त्यांच्या तोंडाला डसायला हवा होता, " असं गोगावले यांनी म्हटलं आहे. याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले की, "अति तिथे माती ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं याला मर्यादा आहे. त्यांनी मर्यादा पाळली पाहीजे. कदाचीत साप त्यांना इशारा द्यायलाच आला असेल", असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवेळी अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच एक साप आल्याची घटना घडली. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता. साप निघाल्याने ही पत्रकार परिषद लवकरच आटोपण्यात आली. यानंतर सर्वमित्राद्वारे या सापाला पकडण्यात आलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in