गौतमी पाटीलविषयीच्या 'त्या' वक्तव्यावरुन संभाजीराजेंची माघार; म्हणाले...

गौतमी पाटीलविषयीच्या 'त्या' वक्तव्यावरुन संभाजीराजेंची माघार; म्हणाले...

अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण! असे म्हणत त्यांनी आपल्या आधिच्या वक्तव्यावरुन माघार घेतली आहे.

महाराष्ट्राला गौतमी पाटील हे नाव काही नवं नाही. सध्या या नावाची राज्यभर चर्चा आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्च कराव लागतो. अशातच गौतमीच्या 'पाटील' आडनावरुन वाद निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक संघटनांनी गौतमीच्या 'पाटील' आडनावर आक्षेप घेतला आहे. तर काहींनी गौतमीला पाठींबा देखील दर्शवला आहे. याचवेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नृत्य आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया देत संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांनी संरक्षण दिलं. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे ते यामुळेचं. म्हणून सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकारांना संरक्षण मिळालं पाहिजे मी या मताचा आहे. असे वक्तव्य संभाजी राजे यांनी केलं होतं.

त्यांनी आता आपल्या वत्कव्यावरुन माघार घेतली आहे. त्यांनी नुकतेच याबाबत ट्विट केलं आहे. आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, काल पत्रकाराने 'कलाकार' असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात असल्याचं म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला ती व्यक्ती आणि तिच्या कलेविषयी काही माहिती नव्हती. महिला कलाकारांना धमक्या येणं चुकीचं समजून मी कलाकारांना संरक्षण दिलं पाहिजे असं बोलून गेलो. मात्र, याचे नकारात्मक प्रतिसाद उमटल्याचे समजल्यावर मी त्या कलाकाराची 'कला' बघितली. त्यामुळे आता महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण! असे म्हणत त्यांनी आपल्या आधिच्या वक्तव्यावरुन माघार घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in