आगामी विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार; अजित पवारांची स्पष्टोक्ती

सोमवारी पुणे येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार; अजित पवारांची स्पष्टोक्ती

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याचं सांगितलं. सोमवारी पुणे येथे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडी युतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असून आम्ही या निर्णयाचं समर्थन करतो. तसेच आमच्या वरिष्ठांच्या मागे आम्ही आहोत, असे अजित पवार यांनी सांगितलं आहे.

यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील नेते आपल्या पक्षाच्या वयक्तिक हिताचा विचार न करता गुणवत्तेच्या आधारावार निवडणुकीत सहभागी होण्यासाठी उमेदवार एकत्रितपणे ठरवतील असं सांगितलं. तसंच महाविकास आघाडीचे आमदार, खासदार कसे वाढवायचे यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगत यासाठी प्रत्येकजण काम करत असल्याचंही ते म्हणाले.

याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वतंत्रपणे निवडणुक लढवून विजय मिळवू शकत नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांचा पराभव करायचा असेल तर अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकजूटीने निवडणुकीत सहभागी होणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणा्ले की, एकट्याने लढून विजय मिळवणे शक्य नाही. हे सत्य आहे. ते सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची युती झाल्यास आपण कोणतेही मतभेद न ठेवता एकत्रितपणे लढलो तर आपण निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in