"...तर राजकीय नेत्यांचा प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली असल्याचंही संजय राऊत म्हणाले
"...तर राजकीय नेत्यांचा प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

काल संपूर्ण भारतीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना काल होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला आहे, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी मी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला फार आनंद झाला असता. मात्र, ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यावर दुर्दैवाने पाणी फिरले, अश्या कठोर शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

"भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झाले आहे. आपल्या या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजीत ही होतच असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा पराभव झाला आहे. नेहमी अंतिम सामना हा दिल्लीत होतो किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात होतो. मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले आहे. भाजप सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता", असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

सर्वात आधी देशाला विश्वचषक मिळून दिला आहे ते कपिल देव यांनी आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, याला म्हणतात राजकारण, असं देखील संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in