हैदराबादेतील सामन्याच्या तिकीटविक्रीत घोळ झालेला नाही - मोहम्मद अझरुद्दीन

हैदराबादमधील सामन्याच्या तिकीटविक्रीमध्ये घोळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
हैदराबादेतील सामन्याच्या तिकीटविक्रीत घोळ झालेला नाही - मोहम्मद अझरुद्दीन

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील रविवारच्या सामन्याआधी तिकीट- विक्रीमध्ये घोळ झालेला नाही,” असा निर्वाळा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी दिला.

हैदराबादमधील सामन्याच्या तिकीटविक्रीमध्ये घोळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. काही जणांनी काळाबाजार झाल्याचा आरोपही केला होता. तिकीट-विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले होते. त्याबाबत अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडली. अझरुद्दीन म्हणाले की, “सिकंदराबाद येथील जिमखाना मैदानावर तिकीटविक्रीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. यात असोसिएशनचा कुठलाही दोष नाही. चाहतेच इतक्या मोठ्या संख्येने आले की, परिस्थिती हाताळणे अवघड झाले.” या घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे की, “एका कंपनीला या सामन्याची संकेतस्थळावर आणि प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर तिकिटे विकण्याचे काम सोपवण्यात आले होते.

तिकीटविक्रीमध्ये कोणताही काळाबाजार झालेला नाही. जर कोणी केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. एखाद्याने संकेतस्थळावरून तिकीट खरेदी करून ते काळाबाजारत विकले असेल तर त्याच्याशी एचसीएचा काहीही संबंध नाही.” अझरुद्दीन म्हणाले की, “हैदराबादला बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन झाले. त्यामुळे अनेक लोक सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली.” एचसीएचे सचिव विजयानंद म्हणाले की, “तिकीट-विक्रीदरम्यान झालेल्या घटनेबाबत चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in