
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या गुप्त बैठकीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योजग अतुल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. राष्ट्रवादीत एकोपा रहावा या दृष्टीने ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. जवळपास ४ तास दोन्ही नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांनी घेतलेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे.
या गुप्त बैठकीविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अद्योगपती अतुल चोरडियांच्या घरी ही बैठक झाली अशी बातमी ऐकली परंतु त्यांनी नकार दिला. मात्र, प्रसारमाध्यमांकडे या फुटेज उपलब्ध आहेत. ही भेट झाली की नाही हे सांगता येत नाही. शरद पवार-अजित पवार यां दोघांपैकी कुणीतरी महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहीजे. १० तारखेपर्यंत मुख्यमंत्री करतो असा शब्द काही जणांनी दिला होता. तो पुर्ण झाला नाही तर पुढे काय? मात्र, शरद पवार यांनी या भेटीबाबत बोलायला हव, असं चव्हाण म्हणाले.
शरद पवार यांनी भाष्य केल्याशिवाय या भेटीवर बोलण योग्य ठरणार नाही. ही गोष्ट फार काळ लपून ठेवता येणार नाही. ही भेट संशयास्पद आहे. या भेटीबाबत कार्यकर्ते आणि मित्रपक्षांना सांगितलं पाहीजे. ही घरगुती बाब नाही. जे काही असेल ते खरे सांगावे. अधिकृत माहिती समोर आणून कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केला पाहिजे, असं देखील चव्हाण म्हणाले.