या सरकारमध्ये ती क्षमता नाही, मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू याचं मोठं वक्तव्य

सरकारला सत्तेत येऊन वर्षभराचा काळ लोटला असून देखील मंत्रमंडळाचा विस्तार झालेला नाही
या सरकारमध्ये ती क्षमता नाही, मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडू याचं मोठं वक्तव्य

शिवसेनेत फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस यांच सरकार आलं. हे सरकार आता वर्षपूर्ती करत आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यावेळी त्यांच्यासोबत प्रहारचे बच्चू कडू यांचा देखील समावेश होता. आता सरकार स्थापन होऊन वर्षपूर्ती झाली तरी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नेहमीच चर्चा होत असते. तसंच यावरुन आरोप प्रत्यारोप देखील झाले आहेत.

याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असं वाटत होतं. दुसऱ्या फेरीत मंत्रिमंडळात निवड होईल असं वाटत होतं. विस्ताराला वर्ष लागेल असं वाटत नव्हतं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून नाराज नाही. सरकारने काही कामे चांगली केली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी मी नाराज नाही. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नाही. आता मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार हा २०२४ मध्ये होईल, ती क्षमता या सरकारमध्ये नाही, असा खोचक टोला लगावत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मागच्या वर्षी शिवसेनेत 'ना भूतो ना भविष्यती' अशी फूट पडली. यावेळी शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांसह अपक्ष आमदारांनीही बंड केलं. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, या सरकारला सत्तेत येऊन वर्षभराचा काळ लोटला असून देखील मंत्रमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांची खदखद बाहेर पडत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in