"या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये, दोन्ही बंधुंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ" ; मनसे नेत्याचं मोठं विधान

या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. मात्र...
"या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये, दोन्ही बंधुंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ" ; मनसे नेत्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात अधून-मधून सुरु असतात. अनेकदा दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी देखील याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही जणांना एकत्र येण्याच आवाहन करणारे बॅनर देखील अनेक ठिकाणी झळकले आहेत. दोन्ही नेत्यांकडून मात्र एकत्र येण्यासंबधी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आता मनसेच्या एका मोठ्या नेत्यानं केलेल्या वक्तव्यावरुन पुन्हा हा विषय पुढे आला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. यामुळे राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, राज्यांत गेल्या काही दिवसांत जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता त्यामुळे अस्वस्थ आहे. जनतेला हा सर्व प्रकार आवडलेला नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हे समजून घेतलं पाहीजे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी नेतृत्व देऊन त्यांना आशिर्वाद दिले पाहीजे. असं आवाहन प्रकाश महाजन यांनी दिलं आहे.

महाजन पुढे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासारखा कार्यक्षण, लोकप्रिय नेता मिळणं अवघड आहे. भाजपचं मला निवल वाटतं की, ते राज ठाकरेंबरोबर वयक्तीक मैत्री ठेवतात पण राजकीय सोयरीक म्हणून त्यांना भ्रष्टाचारी राष्ट्रवादी चालते. भाजपचा हा दुटप्पी पणा आहे. तो उघड करू असं देखील महाजन म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in