"राज्यात तीन घाशीराम कोतवाल राज्य करताय", संजय राऊतांची मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टीका

मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, असं देखील राऊत म्हणाले.
"राज्यात तीन घाशीराम कोतवाल राज्य करताय", संजय राऊतांची मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टीका

नवाब मलिक यांच्या एन्ट्रीने विधिमंडळाचं यंदाचं अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधिवेशनाला हजेरी लावल्यानंतर नवाब मलिक हे कोणत्या गटाला आपलं समर्थन देतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. सभागृहात मलिक हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूला सर्वात शेवटी जाऊन बसले. यावरुन विरोधकांना चांगलीच टीकेची झोड उठवली. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल नवाब मलिकांना पेढा भरवत असतानाचा फोटो ट्वीट केला आहे. यावेळी मलिकांपेक्षाही भयंकर अपराधाचे आरोप असलेले मंत्री कॅबिनेटमध्ये येतात अशी प्रतिक्रिया देखील राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सफाई करावी, भ्रष्टाचाराची सफाई करावी, ते पुढे म्हणाले, त्यांनी सर्व नाटक बंद केले पाहिजे. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची सफाई केली पाहिजे. आपण मुंबई महापालिकेच्या निवडणुका आपण घेत नाही. हे माहापालिकेचे काम आहे. नगरसेवकाचे काम आहे. ठाण्यामध्ये, पुणे, नाशिक १४ महापालिकांच्या निवडणुका घ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे ढोंग करण्याची वेळ येणार नाही. असं म्हणत मुख्यमंत्र्यांची भूमिका ही ठाण्यातील नगरसेवकाप्रमाणे आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी राऊत यांनी महाराष्ट्रात घाशीराम कोतवालांच राज्य असल्याचं टीका केली. तीन घाशीराम कोतवाल राज्य करताय, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल नाटक फार गाजल आहे. ती एक विकृती होती. आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवालच राज्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in