शरद पवारांना केंद्रात 'या' दोन मोठ्या ऑफर ; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजप शरद पवारांना सोबत घेऊन आगामी निवकडणुकांमध्ये आणखी राजकीय स्पेस घेण्यासाठी उत्सुक असल्याचं देखील या नेत्याने सांगितलं.
शरद पवारांना केंद्रात 'या' दोन मोठ्या ऑफर ; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Published on

नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या घरी भेट झाली. या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली असताना देखील याबाबचं वृत्त सर्वत्र पसरलं. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षामंध्ये मात्र तीव्र नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी यावर शंका देखील उपस्थित केली. आता यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवा दावा केला आहे. भाजपकडून शरद पवारांना केंद्रात मोठ्या ऑफर देण्यात आल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना केंद्रात कृषी खात आणि निती आयोगाचे चेअरमनपद अशा २ ऑफर देण्यात अजित दादांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु पवारांनी या दोन्ही ऑफर नाकरल्या आहेत, असं चव्हाण म्हणाले. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यामध्ये ३-४ वेळा बैठक झाली. यात शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी भाजपची रणनिती असल्याचं दिसून येतं. एवढंच नाही तर जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांना देखील समावून घेण्यासाठीची ऑफर शरद पवारांना कळवावी असा निरोप अजित पवारांना देण्यात आला होता. भाजप शरद पवारांना सोबत घेऊन आगामी निवकडणुकांमध्ये आणखी राजकीय स्पेस घेण्यासाठी उत्सुक असल्याचं पृथ्वीराच चव्हाण म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in