सनातन धर्माविषयीच्या वक्तव्यानंतर उदयनिधी पुन्हा चर्चेत ; हिंदी भाषेवरुन थेट अमित शाहांनाच भिडले

सनातन धर्माविषयीच्या वक्तव्यानंतर उदयनिधी पुन्हा चर्चेत ; हिंदी भाषेवरुन थेट अमित शाहांनाच भिडले

आमित शाहांनी हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदी भाषेविषयी वक्तव्य केलं होतं. त्यावर उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर अनेकांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली होती. तर काहींनी त्यांची पाठराखण देखील केली होती. आता उदयनिधी एका नव्या वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आमित शाह आज हिंदी दिनानिमित्ताने एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी 'हिंदी भाषा देशाला एकत्र आणेल' असं विधान केलं. त्यावर उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अमित शाह

हिंदी दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेविषयी वक्तव्य केलं. ते म्हणाले की, हिंदी भारतातील भाषेच्या विविधतेला एकत्र करते. तसंच या भाषेनं विविध भारतीय, जागतिक भाषा आणि बोलींचा सन्मान केला आहे. हिंदीनं कधीही इतर भारतीय भाषेशी स्पर्धा केली नाही. किंवा स्पर्धा करणार नाही. उलट सर्वा भाषांना बळकट करुन एक मजबूत देश उदयास येईल. अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन तामिळनाडूनचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांचं शहांना प्रत्युत्तर

अमित शहा यांनी केलेल्या विधानावर उदयनिधी स्टॅलिन यांनी 'एक्स'वर(ट्विटर) शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते देशातील विविध भाषांना हिंदी भाषा एकत्र आणेल. ती प्रांतीक भाषांना सक्षम करेल, असं विधान नेहमीप्रमाने अमित शाह यांनी केलं. त्यांनी हिंदी भाषेवर स्तुती सुमनं उधळण्याचं काम केलं. हिंदी भाषेचा अभ्यास केल्यास तुमची प्रगती होईल हे वेगळ्या पद्धतीनं सांगणं आहे. तामिळनाडूत तमिळ भाषा, केरळमध्ये मल्याळम भाषा आहेत. या दोन्ही राज्यांना हिंदी भाषेनं कुठे एकत्र केलं आहे. यामुळे कुठलं सक्षमीकरणं झालंय? असा सवाल उदयनिधी यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in