
सनातन धर्म समता आमि समाजिक न्यायाच्या विरोधात असून त्याचं निर्मुलन केलं पाहीजे. असं मत द्रमुक पक्षाचे नेते आणि तामिळनाडूचे युवा कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी सनादन धर्माची तुलना कोरोना व्हायरल, मलेरिया आणि डेंग्युशी केली होती. अशा गोष्टींचा विरोध न करता त्यांना नष्ट करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. उदयनिधी यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावर आता उदयनिधी यांनी भाजपवर चांगलाच पलटवार केला आहे.
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल देशातील २६२ नामवंतांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीस डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. असं असलं तरी उदयनिधी मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. भाजकडून करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना उदयनिधी म्हणाले की, भाजप नेत्यांनी माझ्या विधानाचा योग्य प्रकारे अर्थ घेतला नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही, हे सर्वांना माहिती आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचार आणि मणिपूर हिंसाचारापासून लक्ष विचलीत करण्यासाठी सनातन धर्माचा वापर करत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून भाजपची सर्व आश्वासने पोकळ ठरली असून त्यांनी आमच्या कल्याणासाठी नेमके काय केले, असा प्रश्न भाजप सरकारविरोधात संपूर्ण देश एकजुटीने करत आहेत. पंतप्रधान मोदींचं अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जात आहे. असा हल्लाबोल उदयनिधी यांनी भाजपवर केला.