
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील होते. या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या भेटीवर विविध चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज पवार आणि ठाकरे यांच्यातील भेट होत असल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीने किती जागा जिंकल्या यावर देखील या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आगामी निवडणुकीवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या स्थापनेबाबतही चर्चा होणार असल्याची वर्तवली जात होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अदानींवबाबत उद्धव ठाकरे यांची काही मते आहे, त्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. बैठकीला ही पार्श्वभूमी देखील आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्वव ठाकरे यांनी आदानी यांच्यावर निशाणा साधला होता. धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाकडे गेले आहेत. त्यावरुन उद्वव ठाकरे यांनी अदानी आणि भाजप यांच्या संबंधांवर भाष्ट केलं होतं.
दरम्यान, आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सिल्वर ओकवर घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.