उद्धव ठाकरेंना दिसाला ; राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी माझगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

१५ हजारांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.
उद्धव ठाकरेंना दिसाला ; राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी माझगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी ठाकरे आणि राऊत यांना माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजारांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.

उद्धव ठाकरे या सुनावणीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी याबाबतच्या कागदपत्रांनी स्वाक्षरी केली. यावेळी कोर्टाने राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का? अशी विचारणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचं म्हटलं.

राहुल शेवाळे यांनी सामना या वृत्तपत्रात माझ्याविरोधात बदमामामीकारक मजकूर छापून आला, असा आरोप केला करत कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझी माफी मागावी, अशी मागणी राहुल शेवाळेंनी केली होती. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून हे प्रकरण कोर्टात आहे. कोर्टाने जामीन मंजूर केल्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in