Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंच्या बालिशपणाची किव येते", चित्रा वाघ यांची बोचरी टीका

त्यांची ना घरका ना घाटका अशी अवस्था झाली आहे. त्यांना त्यांच्याच नाकर्तेपणामुळे विदूषकी वागण्याची वेळ आली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Chitra Wagh : "उद्धव ठाकरेंच्या बालिशपणाची किव येते", चित्रा वाघ यांची बोचरी टीका

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. राज्यात विदूषकाची टोळी फिरत आहे. उद्धव ठाकरे यांना दुसरं काम उरलं नाही. त्यामुळे ते मनोरंजन करतात, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. जी-२० जागतीक परिषदेचे नेतृत्व भारत करत असताना दुसरीकडे काहींच्या पोटात दुखत होतं. त्यात उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर लागतो. उद्धव ठाकरे यांच्या बालिशपणाची आम्हाला किव येत आहे. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादात स्वत:;च्या सडलेल्या आणि पोकळ बुद्दीचा भोपळा बाहेर फोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्राने त्यांचे विकृत विचार ऐकले. त्यांची ना घरका ना घाटका अशी अवस्था झाली आहे. त्यांना त्यांच्याच नाकर्तेपणामुळे विदूषकी वागण्याची वेळ आली आहे.

विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो, पण उद्धव ठाकरेंना ते देखील जमत नाही. ते एकटे नाहीत तर सध्या विदूषकांची टोळी राज्यात फिरत आहे. त्यात पहिले विदूषक सर्वज्ञानी संजय राऊत, दुसरे विदूषक भास्कर जाधव आणि तिसरे विदूषक उद्धव ठाकरे आहेत. लोकांना हसवनहे विदूषकांचं काम असतं हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचं काम करतात, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्पप्न होतं. आज नरेंद्र मोदी ते पूर्ण करत आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात बदल झाला. आधी ते हिंदू विरोधी होते. आता तर ते श्रीरामांच्या विरोधात गेले आहेत. असं देखील त्या म्हणाल्या. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in