ठाण्यात उद्धव ठाकरेंचा भगवा फडकवू ; पवारांच्या 'या' शिलेदाराच्या विधानाची सर्वत्र चर्चा

ठाणे महानगर पालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकवू असे उद्गार या नेत्याने काढल्याने सर्वजण आश्चर्च चकीत झाले आहेत
 ठाण्यात उद्धव ठाकरेंचा भगवा फडकवू ; पवारांच्या 'या' शिलेदाराच्या विधानाची सर्वत्र चर्चा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष हा वाढताना दिसत आहे. दोन्ही गटांकडून आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. ठाकरे गटाने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा गड ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ठाणे महानगर पालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकवू असे उद्गार या नेत्याने काढल्याने सर्वजण आश्चर्च चकीत झाले आहेत.

मी विचारधारेने काँग्रेसी आणि शरद पवार यांचा कट्टर निष्ठावान असलो तरी येणाऱ्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकवू असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर कार्यक्रमात आव्हाड यांनी हे उद्गार काढले आहेत. यावेळी ठाणे महापालिकेवर भगवा फडकवणे हा आमचा शब्द आहे, असं देखील ते म्हणाले.

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्याच्या राजकारणात जे काही घडत आहे. ज्या पद्धतीने राजकीय पक्ष फोडले जात आहेत. सत्तास्थापन केली जात आहे. हे लोक पाहत आहेत. हे जनतेला आवडलेलं नाही. राज्यातील जनता प्रेमळ आहे. पण ती सह्याद्रीच्या कड्यासारखी सुद्धा आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ती या सर्वांचा विचार करेल. ठाण्यातील जनतेला येणाऱ्या निवडणुकांमध्य पैशाचा महापूर येईल असं वाटतं. पण लोकांच्या मनात घाणेरड्या राजकारणाबद्दल ज्वालामुखी पेटला आहे. त्यामुळेया ज्वालामुखीसमोर पैशांचे वारे भस्मसात होईल, असं देखील आव्हाड म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in