देशातील चार राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु असुन तीन छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राज्यस्थान या राज्यात भाजपने काँग्रेसला पिछाडीवर टाकलं आहे. सध्या राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष ११४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसची मोठी पिछाडी झाली असून काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. BSP १ तर इतर उमेदवार १३ जागांवर आघाडीवर आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य उमेदवार आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे तब्बल मतांनी विजयी झाल्या आहेत. वसुंधरा राजे या २००३ सालपासून झालरापाटन मतदारसंघातून विजयी होत आहेत.
दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर सुरळीतपण व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी ८ वाजेपासून सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिकांची मत मोजणी सुरु झाली होती.