विजय वडेट्टीवार यांचा सत्ता बदलाविषयी मोठा दावा ; म्हणाले, "मी ठासून सांगतो की..."

राज्यात किती दिवसात सत्ता बदलेल याबाबतचं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. हे सांगताना त्यांनी आमचं सरकार(मविआ) येणार नाही, मात्र ...
विजय वडेट्टीवार यांचा सत्ता बदलाविषयी मोठा दावा ; म्हणाले, "मी ठासून सांगतो की..."

राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांनी राज्यातील सत्तेबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधान आलं असून वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राज्यात किती दिवसात सत्ता बदलेल याबाबतचं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. हे सांगताना त्यांनी आमचं सरकार(मविआ) येणार नाही, मात्र राज्याच्या मुख्य खुर्चीत बदल होऊल असा दावा केला आहे. आज १९ ऑगस्ट (शनिवार) रोजी मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

विजय वडेट्टीवार राज्यातील सत्ताबदलाविषय बोलताना म्हणाले की, पुण्यातील उपमुख्यमंत्री बैठकीला दांडी मारतात, तर कधी नागपूरमधील उपमुख्यमंत्री बैठकीला दांडी मारतात. हे तिघेही एकत्र येत नाहीत. आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आले तर मुख्यमंत्री येत नाहीत. हे सगळं आलबेल नाही. हा सगळा तमाशा राज्याच्या जनतेला दिसत आहे. यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पत घालवली आहे. "

सप्टेंबरमध्ये बदल होईल

सत्तेच्या हव्यासाने महाराष्ट्रात वाट्टेल ते सुरु असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तर येणाऱ्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्रात काय बदल होईल हे जनता बघेल. यात मुख्यखुर्चीपासून बदलाल सुरुवात होईल. सप्टेंबर २०२३ हा महिना राज्यातील सत्ताबदलाचा असेल असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुख्य खुर्चीवरील व्यक्ती बदलेल

राज्यातील सत्ता बदलाविषय बोलताना वडेट्टीवार यांनी राज्याच्या सत्तेत सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचं सांगितलं. मात्र, यावेळी त्यांनी आमचं (मविआ) सरकार येणार नाही हे देखील स्पष्ट केल. ते म्हणाले की, "सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल, असं आम्ही म्हणत नाही. मात्र, मी ठासून सांगतो की, मुख्य खुर्ची बदलेल, " असा दावा त्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in