थिएटरमध्ये पहा निवडणूक निकाल, थेट प्रक्षेपण होणार; ९९ ते ३०० रुपये तिकीट

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील मोठ्या पडद्यांवर हा निकाल पाहता येणार आहे.
थिएटरमध्ये पहा निवडणूक निकाल, थेट प्रक्षेपण होणार; ९९ ते ३०० रुपये तिकीट
प्रातिनिधिक फोटो

रुचा खानोलकर/मुंबई

लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर होणार आहेत. या निकालाचे प्रक्षेपण टीव्ही वाहिन्या, इंटरनेटवर होणार आहे. मात्र, कोणाला या निकालाचे प्रक्षेपण भव्य पडद्यावर पाहायचे असल्यास तशी सोयही आता झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील मोठ्या पडद्यांवर हा निकाल पाहता येणार आहे.

मुंबईतील सायन येथील मुव्हीमॅक्स थिएटरमध्ये निकालाचे ‘लाइव्ह प्रक्षेपण’ होणार आहे. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, एसएम५, कल्याण, इटर्निटी मॉल, ठाणे-कांजुरमार्ग, वंडरमॉल ठाणे, मीरा रोड, मुव्हीमॅक्स चित्रपटगृहांची साखळी येथे निकालाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

सकाळी ९ वाजल्यापासून सलग सहा तास हे प्रक्षेपण पाहता येईल. या मतमोजणी प्रक्षेपणासाठी ९९ ते ३०० रुपये तिकीट आहे.

पुण्यात मुव्हीमॅक्स अमनोरा, नाशिकमध्ये ‘द झोन’, नागपुरात ‘मुव्हीमॅक्स’ एटर्निटी नगर येथे नागरिकांना थिएटरमध्ये बसून निवडणूक निकाल पाहता येतील.

पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक वेगळ्या पद्धतीने ही मतमोजणी दाखवण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in