"दत्ता दळवी यांना जामीन मिळाली नाही तर रस्ता अडवून ठेवू", ठाकरे गट आक्रमक

दत्ता दळवी यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
"दत्ता दळवी यांना जामीन मिळाली नाही तर रस्ता अडवून ठेवू", ठाकरे गट आक्रमक

मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपशब्द वापरल्या बद्दल दत्ता दळवी यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, ठाकरे गटाकडून लगेच दत्त दळवी त्यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला, पण अद्यापि त्यांना जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे आज तरी पोलीस कोर्टात म्हणणं मांडतात का? आणि त्यानंतर दत्ता दळवी यांना जामीन मिळतो का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दत्त दळवी यांना जामीन न मिळाला नाही तर महामार्ग रोखून धरू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. तसंच, जामीन न मिळाल्यास ईशान्य मुंबईत शिवसैनिक आक्रमक होतील, असा इशारा देखील ठाकरे गटानं दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्त दळवी यांच्या अटकेवरून सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल, असं या सामनात म्हटलं गेलं आहे. दरम्यान भांडूपमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

जाहीर सभेत दत्त दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे काही अज्ञातांनी दत्ता दळवींच्या घराच्या परिसरात शिरुन त्याच्या गाडीची तोडफोड देखील केली आहे. आज सकाळी पोलिसांनी दत्ता दळवींना अटक केली आहे. कोर्टानं आता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तातडीनं दळवींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र आज जामिनावर निर्णय झाला नाही. त्यामुळे दळवींना ठाणे कारागृहाकडे नेण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in