राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याचा प्रस्ताव आला तर? उद्धव ठाकरेंनी मांडली थेट भूमिका म्हणाले...

सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.
राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याचा प्रस्ताव आला तर? उद्धव ठाकरेंनी मांडली थेट भूमिका म्हणाले...
Published on

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व अशा घडामोडी घडताना दिसत आहेत. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर भाजप-राष्ट्रवादी(अजिद पवार गट)- शिवसेना(शिंदे गट) हे एकत्र येत सत्तेत सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. याता यावर स्वत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी आपली थेट भूमिका स्पष्ट केली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार का याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी आणी राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता तर चर्चा थांबली नसती. चर्चा झाली आणि थांबली. चर्चा करणाऱ्याला आधार मिळाली नाही. त्यामुळे ती चर्चा थांबली असेल ", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी असा प्रस्ताव आला तर? असा प्रश्न विचारला. त्यावेली उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. यावर उत्तर देताना त्यांनी, "मी प्रस्ताव आला का तर, गेला तर यावर विचार करत नाही. आला तरी विचार करत नाही आणि गेला तरी त्यावर मी विचार करत नाही. त्या क्षणाला काय असतं त्याचा मी विचार करतो. त्यामुळे आता तरी तशी काही चर्चा नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याची काही आवश्यकता नाही", असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

logo
marathi.freepressjournal.in