शरद पवारांचं 'त्या' विधानावरुन घुमजाव, तर अजित पवार म्हणाले, 'नो कमेंट्स'

आता परत संधी द्यायची नसते आणि मागयची नसते, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचे परतीचे दोर देखील कापून टाकले.
शरद पवारांचं 'त्या' विधानावरुन घुमजाव, तर अजित पवार म्हणाले, 'नो कमेंट्स'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी अजित पवारांबाबत(Ajit pawar) केलेल्या विधानावरुन खळबळ उडाली आहे. मात्र, आता शरद पवारांनी आपल्या विधानावरुन घुमजाव केलं आहे. "अजित पवार आमचे नेते आहेत मी असं म्हणालोच नाही," असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया (Supriya Sule)त्यांची घाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात त्या सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

अजित पवार हे आमचेच नेते आहेत. कोणी वेगळा निर्णय घेतल्याने पक्षात फूट पडली असा अर्थ होत नाही, असं शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीतील पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. तसंच महाविकास आघाडीत संभ्रम देखील निर्माण झाला होता.

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून बारामतीहून साताऱ्यात पोहचल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांचा संदर्भ देत, अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणीही नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

परतीचे दोरच टाकले कापून

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, फूट म्हणजे एखादा मोठा गट फूटला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागयची नसते, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचे परतीचे दोर देखील कापून टाकले.

दरम्यान, शदर पवारांनी साताऱ्यात केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी 'नो कमेंट्स' असं म्हणत त्यावर भाष्य करणं टाळलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in