अजित पवार मुख्यमंत्री होतील का? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपने शब्द दिल्याचा दावा केला होता
अजित पवार मुख्यमंत्री होतील का? भाजप खासदार स्पष्टच म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या एका गटासोबत शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपने शब्द दिल्याचा दावा केला होता. यावर याता भाजप खासदार संजय काकडे यांनी थेट विधान केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार यावर संजय काकडे यांनी थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा कुणापासून लपून राहिलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हे जगजाहीर आहे. अजित पवार यांच्या वरिष्ठांची वाटाघाटी झाल्या असतील तर ते मुख्यमंत्री होतील. असं विधान काकडे यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी येत्या लोकसभेत काय होईल ते पाहणं महत्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं आहे. आगामी निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात तसंच कोण किती जागा निवडूण आणतं. यावर सगळी आकडेमोड अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, बिहारमध्ये नितीश कुमरांची कमी लोक निवडून येऊन देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. कारण त्यांनी लोकसभेला आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं. एकनाथ शिंदे यांना देखील कमी आमदार असून त्यांना आम्ही मुख्यमंत्री केलं. तसंच याआधी मायावतींना देखील कमी आमदार असून अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा सल्ला भाजपने दिली होता. त्यामुळे अजित पवार आणि आमच्या नेतृत्वामध्ये काही ठरलं असले तर ते नक्की मुख्यमंत्री होतील, असं संजय काकडे यांनी म्हटलं आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in