नवाब मलिक अजित पवार गटात जाणार? प्रफुल्ल पटेल म्हणाले...

नवाब मलिक जामीनवर बाहेर आल्यानंतर शरद पवार गटातील नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांची भेट घेत तब्येतीची विचारपुस केली होती.
नवाब मलिक अजित पवार गटात जाणार?  प्रफुल्ल पटेल म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे गेल्या दीड वर्षापासून मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात होते. अखेर सुप्रिम कोर्टाने त्यांना आजारपणावर उपचार करण्यासाठी जामीन दिला आहे. मलिक यांना सोमवारी सायंकाळी रुग्णालयात सोडण्यात आलं. यानंतर शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांची भेट घेत तब्येतीची विचारपुस केली. यानंतर आज अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांनी भेट घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांचं कुटुंब अजित पवार यांच्या भेटीला जात होतं. यामुळे नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यावर अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता मलिक कोणत्या गटात जाणार, मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात कोणती चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली का? यावर प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांना प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळं सुप्रीम कोर्टानं दोन महिन्याचा जामीन दिला आहे. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांना राजकारणात घेण्यापेक्षा विश्रातींची गरज आहे. यामुळे आम्ही ते कोणासोबत जाणार किंवा राजकीय चर्चा केली नाही. असं पटेल म्हणाले. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचं वजन कमी झालं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर माणसाची प्रकृती कशी असते. हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पुढे कोणते उपाचार घ्यावे यावर चर्चा झाली असल्याचं पटेल म्हणाले.

नवाब मलिक यांना ११ ऑगस्ट रोजी सुप्रिय कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. वैद्यकीय चाचणीतून मलिक यांची एक किडनी निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे न्यायालयाने त्यांचा उपचारासाठी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिल्याचं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in