राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? सुषमा अंधारे यांचं मोठं वक्तव्य

फसवणूक करुन गेलेल्यांना मी अजून भाऊ म्हणते. मग...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? सुषमा अंधारे यांचं मोठं वक्तव्य

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी याबाबतचे पोस्टर देखील लावले आहेत. आता ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर सुष्मा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, पाण्यात काठी मारल्याने पाणी विभागलं जात नाही. नाही आणि ऋणानुबंध बोलण्याने तुटत नसतात, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कार्यकर्त्यांनी राजकी0य दृष्ट्या काही मागणी केल्यास निश्चिति कार्यकर्त्यांचं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांची हिचं इच्छा आहे, असं सुचक वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, फसवणूक करुन गेलेल्यांना मी अजून भाऊ म्हणते. मग, जिथे रक्ताचे भाऊ आहेत त्यांच्याबद्दल माझी काय भूमिका असून शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजेत अशी इच्छा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांनी एकत्र यायला हवं, पण हा प्रश्न नेतृत्वाच्या पातळीचा आहे. राज ठाकरे किंवा अन्य कोणी कोणी यावर भाष्य करत नाही, तोवर यावर भाष्य करण उचित नसेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in