ऑलिम्पिकच्या तयारीसाठी बीसीसीआयकडून ८.५ कोटी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना तयारीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ८.५ कोटींचे आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना तयारीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ८.५ कोटींचे आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रविवारी याविषयी घोषणा केली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) यासाठी आभार मानले आहेत.

“ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंना बीसीसीआयकडून आर्थिक सहाय्य करताना मला फार आनंद होत आहे. बीसीसीआयकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ८.५ कोटींचा निधी देण्यात येत आहे. आपले खेळाडू नक्कीच देशाचे नाव उंचावतील,” असे ट्वीट जय शहा यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in