भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना अनिर्णित; भारतीय संघाचा २ - १ असा मालिका विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना हा अनिर्णित राहिल्यानंतर भारताने बॉर्डर गावस्कर चषक २ - १ असा जिंकला
भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना अनिर्णित; भारतीय संघाचा २ - १ असा मालिका विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. बॉर्डर गावस्कर चषकच्या या ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर २ - १ असा विजय मिळवला. दरम्यान, याआधीच भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गेल्याची खुशखबर मिळाली. दरम्यान, चौथ्या सामन्यात १८६ धावा करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर तर २५ विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर रचला होता. यावेळी उस्मान ख्वाजाने १८० धावा आणि कॅमेरून ग्रीनने ११४ धावा केल्या होत्या. यावेळी अश्विनने ९१ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. तर शमीने २ आणि रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. याचे उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गिलने १२८ धावा तर विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. तसेच, अक्षर पटेलनेदेखील ७९ धावा आणि श्रीकर भरत याने ४४ धावांचे मोलाचे योगदान दिले. या जोरावर भारताने ५७१ धावा केल्या. अखेर पाचव्या दिवशी हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. पहिले २ सामने भारताने जिंकल्यानंतर तिसरा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे या सामान्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in