अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा नवा अध्यक्ष

अजित आगरकरने यापूर्वी मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद तसंच दिल्ली संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून पद सांभाळलं आहे
अजित आगरकर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा नवा अध्यक्ष

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआने ट्विट करत अजित आगरकर याच्या नियुत्तीची माहिती दिली आहे. अजित आगरकर यांने यापूर्वी मुंबई संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद तसंच दिल्ली संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून पद सांभाळलं आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांमधून अजित आगरकर याचा अनुभव जास्त असल्याने त्याची निवड करण्यात आली असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्ष म्हणून अजित आगकर काम पाहिलं. तर सुब्रतो बॅनर्जी, शिवसुंदर दास, सलील अंकोला, श्रीधरन श्रीनाथ हे निवड समितीचे सदस्य असतील. अजित आगारकर हा रमाकांत आचरेकर यांचा शिष्य असून त्याने २६ कसोटी सामन्यात ५७१ धावा करत ५९ विकेट घेतल्या आहेत. तर १९१ वन डे सामन्यात २८८ विकेट घेत १२६९ धावा चोपल्या आहेत. तसंच त्याने टी २० मध्ये देखील ३ विकेट घेतल्या आहेत. त्याने खेळलेल्या ४२ आयपीएलच्या सामन्यात २९ विकेट घेतल्या आहेत. अजित आगरकरने २०२१ साली देखील निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मुलाखत दिली होती. पण चेतन शर्मा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा आघाडीचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग यांच्या नावाची देखील भारतीय निवड समितीच्या अध्यपदासाठी चर्चा होत होती. मात्र, सेहवागने आपण या पदाच्या शर्यतीत नसल्याचं म्हणतं चर्चांना पूर्ण विराम दिला होता. त्यानंतर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याने दिल्ली संघाच्या गोलंदाजीचा प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्याची भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित मानली जात होती. आज त्याच्या निवडीवर बीसीसीआयकडून शिक्कामोर्तब झालं आहे.

logo
marathi.freepressjournal.in