श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs Sri Lanka) टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात (Team India) मोठे बदल करण्यात आले असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली असतानाच काही खेळाडूंकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. वन-डे (ODI) संघाच्या नेतृत्त्वाची धुरा नियमित कर्णधार रोहित शर्मा वाहणार आहे. तर, टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपविण्यात आली. तसेच, उपकर्णधार पदी पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांना फिट असूनही डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, निवड समिती त्यांना खेळविण्यासाठी कोणतीही घाई करणार नसल्याचे बोलले जात आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेसाठी के एल राहुल आणि ईशान यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
टी-२० मालिकेसाठी संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
वन-डे मालिकेसाठी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.