धक्कादायक! भारतीय क्रिकेट संघात इंजेक्शनचा खेळ... चेतन शर्मांचा गौप्यस्फोट

भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मांच्या एका स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक माहिती समोर
धक्कादायक! भारतीय क्रिकेट संघात इंजेक्शनचा खेळ... चेतन शर्मांचा गौप्यस्फोट

भारतीय क्रिकेट संघाबद्दल काही धक्कादायक खुलासे एका स्टिंग ऑपरेशमधून समोर आले आहेत. संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेटमधील काही धक्कादायक खुलासे केल्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. यामध्ये त्यांनी, 'राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटू महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी फिट होण्यासाठी अनेकदा गुप्त इंजेक्शन घेतात' असा गौप्यस्फोट केला.

झी न्यूजने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू स्वत:ला तंदुरुस्त ठरवण्यासाठी इंजेक्शन घेतात, असा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, "सुपरस्टार खेळाडूंकडे डॉक्टरांची काय कमी आहे. काही खेळाडू हे एकांतात इंजेक्शन घेतात. ते पेन किलर नसून या इंजेक्शन्समध्ये असे औषध असते जे डोप टेस्टमध्ये पकडले जात नाही. बुमराहची दुखापत इतकी गंभीर होती की जर त्याने ऑस्ट्रेलियातील टी - २० सामना खेळला असता तर तो किमान एक वर्षासाठी बाहेर गेला असता. खेळाडू तंदुरुस्त नसतात, पण ते तरीही ८० टक्के फिटनेसवरही खेळायला तयार असतात, यासाठी ते इंजेक्शन घेतात." असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय भूमिका मांडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in