मोठी बातमी! स्टिंग ऑपरेशनमुळे वादात सापडलेल्या चेतन शर्मांचा राजीनामा मंजूर

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे चेतन शर्मा यांनी पाठवलेला राजीनामा सावकाराला असल्याची माहिती
मोठी बातमी! स्टिंग ऑपरेशनमुळे वादात सापडलेल्या चेतन शर्मांचा राजीनामा मंजूर

भारतीय क्रिकेट विश्वात संघांचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासोबत केलेलं स्टिंग ऑपरेशन बाहेर आले आणि एकच खळबळ उडाली. यानंतर बीसीसीआय त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आता संदर्भात मोठी बातमी समोर आली असून चेतन शर्मा यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचेही सांगण्यात येत आहे.

एका वृत्तवाहिनीने केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून ते खेळाडूंना इंजेक्शन घेण्यापर्यंत अनेक बाबींवर भाष्य केले. ते म्हणाले होते की, भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त दाखवून फिटनेस टेस्ट पास होण्यासाठी इंजेक्शन घेतात. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप टेस्टमध्ये आढळत नाहीत. बनावट फिटनेससाठी इंजेक्शन घेणाऱ्या या सर्व खेळाडूंना बाहेरचे डॉक्टरही असल्याचे धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली होती.

logo
marathi.freepressjournal.in