जडेजाला बढती ; बुमराहची चलती

बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत राहुलची घसरण
जडेजाला बढती ; बुमराहची चलती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या पुरुष खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीत स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला बढती मिळाली आहे; तर दु‌खापतग्रस्त जसप्रीत बुमराहची चलती कायम आहे. के. एल. राहुलची मात्र घसरण झाली आहे. यंदा जडेजाला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह यादीत पदोन्नती मिळाली आहे. शिखर धवन आणि के एल राहुल यांना मात्र नव्याने जाहीर झालेल्या करारांमध्ये थेट सी गटातील खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

बीसीसीआयने सादर केलेल्या यादीत २६ खेळाडूंचा समावेश असून त्यांना चार श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. ए प्लस, ए, बी आणि सी अशा श्रेणीनुसार प्रत्येक खेळाडूला ठराविक रक्कम ऑक्टोबर २०२२- सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी बीसीसीआयकडून देण्यात येणार आहे. नेहमीच्या तरतुदीनुसार ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना सात कोटी रूपये मानधन म्हणून मिळणार आहेत; तर ए गट श्रेणीतील खेळाडूंना पाच कोटी रूपये मिळणार आहेत. बी गट श्रेणीतील खेळाडूंना तीन कोटी रूपये मिळणार आहेत. सी गट श्रेणीतील खेळाडूंना एक कोटी रूपये मिळणार आहेत.

रहाणे, भुवनेश्वर, इशांत ‘आऊट’

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक कराराच्या यादीत यादीत अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली; तर काही ज्येष्ठ खेळाडूंची नावे वगळण्यात आली. यादीत गोलंदाज अजिंक्य रहाणे, केवळ टी-२० संघाचा भाग असलेला भुवनेश्वर कुमार आणि गेल्या काही वर्षांपासून केवळ कसोटी संघाचा भाग असलेला इशांत शर्मा यांच्या नावाचा समावेश नाही.

ए प्लस (७ कोटी)

रोहित शर्मा

विराट कोहली

जसप्रीत बुमराह

रवींद्र जडेजा

ए गट (५ कोटी)

हार्दिक पांड्या

आर अश्विन

मोहम्मद. शमी

ऋषभ पंत

अक्षर पटेल

बी गट (३ कोटी)

चेतेश्वर पुजारा

केएल राहुल

श्रेयस अय्यर

मोहम्मद.सिराज

सूर्यकुमार यादव

शुभमन गिल

सी गट (१ कोटी)

उमेश यादव

शिखर धवन

शार्दुल ठाकूर

इशान किशन

दीपक हुडा

युझवेंद्र चहल

कुलदीप यादव

वॉशिंग्टन सुंदर

संजू सॅमसन

अर्शदीप सिंग

के एस भरत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in