BCCI Message video for Rishabh Pant : तू एक फायटर आहेस; टीम इंडियाचा रिषभ पंतसाठी भावनिक संदेश

भीषण अपघातानंतर आता भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (BCCI Message video for Rishabh Pant) हा रुग्णालयात दाखल असताना त्याच्या सहकाऱ्यांनी भावनिक संदेश दिला आहे
BCCI Message video for Rishabh Pant : तू एक फायटर आहेस; टीम इंडियाचा रिषभ पंतसाठी भावनिक संदेश

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा ३० डिसेंबरला भीषण अपघात झाला. (BCCI Message video for Rishabh Pant) दिल्लीहून त्याच्या मूळ गावी जाताना त्याला डुलकी लागली आणि त्याची गाडी दुभाजकावर आदळली. गाडीमध्ये आग लागून गाडीची राख झाली. पण सुदैवाने रिषभ पंतला गंभीर दुखापत झालेली नाही. यानंतर देशभरातून तो लवकर बारा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. अशामध्ये आता बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडीओ शेअर करत ऋषभ पंतला धीर दिला आहे. यामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह टी-२० कर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, इशान किशन आणि शुबमन गिल यांनी व्हिडीओमधून त्याला धीर दिला आहे.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे त्याला संदेश देताना म्हणाले की, "ऋषभ, तुला आता अधिक त्रास होणार नाही अशी आशा करतो. लवकरच तू ठणठणीत होशील अशी आशा आहे. गेल्या वर्षात भारतीय कसोटीमध्ये तू केलेल्या काही महान खेळी पाहण्याचा बहुमान मिळाला. जेव्हा केव्हा अडचणी आल्या, तेव्हा तू या अडचणींमधून स्वतःला बाहेर काढण्याची भूमिका साकारायचा. हेदेखील एक आव्हान आहे. आणि मला खात्री आहे की यावरही मात करत तू पुन्हा एकदा लवकरच मैदानात परतणार आहेस." असा भावनिक संदेश त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in