पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल हे दोन्ही हंगाम २०२५ मध्ये एकाच वेळी होणार

बीसीसीआयला आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये मार्च ते जून अशी अडीच महिन्यांची विंडो प्रत्येक वर्षी मिळणार आहे
पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल हे दोन्ही हंगाम २०२५ मध्ये एकाच वेळी होणार

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) आणि आयपीएल हे दोन्ही हंगाम २०२५ मध्ये एकाच वेळी होणार असल्याने असल्यामुळे पाकिस्तानला मोठा तोटा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पीएसएलमध्ये मिळणाऱ्या पैशापेक्षा आयपीएलमध्ये मिळणारी रक्कम कित्येक पटीने जास्त असल्याने विदेशी खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे. त्यातच पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करायची आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसी फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये (एफटीपी) आयपीएलसाठी प्रत्येक वर्षी अडीच महिन्यांची विंडो मिळविली आहे. ही विंडो २०२३ पासूनच्या आयसीसी फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये मिळणार आहे. बीसीसीआयला आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये मार्च ते जून अशी अडीच महिन्यांची विंडो प्रत्येक वर्षी मिळणार आहे.

पीसीबी प्रत्येक वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात आयोजित होत असते; मात्र २०२५ मध्ये पीसीबीचा हंगाम पाकिस्तानला मार्च ते मे या दरम्यान घ्यावा लागणार आहे. पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करायची आहे. त्यामुळे मार्च ते मे या दरम्यान पाकिस्तानच्या पीसीबीचा शेवट आणि भारताच्या आयपीएलचे सुरूवातीचे दोन आठवडे क्लॅश होण्याची शक्यता आहे.

याबाबत पीसीबीचे सीईओ फैजल हसनैन यांनी सांगितले की, ‘फ्युचर टूर प्रोग्राम २०२३-२०२७ नियोजित करण्यात आला. त्यावेळी या भरगच्च कार्यक्रमात आम्ही परिस्थिती, गुणवत्ता आणि खेळाडूंचा वर्कलोड याला प्राधान्य दिले. तिन्ही फॉरमॅट योग्यरित्या सुरू राहण्यासाठी तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये योग्य समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला.'

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in