सीएसकेवर होत आहे बंदी घालण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?

महेंद्र सिंग धोनीची आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग हा सांगा पुन्हा एकदा वादात सापडला असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे
सीएसकेवर होत आहे बंदी घालण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?

सध्या आयपीएल २०२३ सुरु असून चेन्नई सुपर किंग्स हा संघ चांगलाच चर्चेत आहे. आत्तापर्यंत सीएसकेने ३ सामने खेळले असून २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर एक गमावला आहे. तसेच, संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी हादेखील पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आल्याने आयपीएलचे चाहते खुश आहेत. मात्र. सध्या या संघावर पुन्हा एकदा बंदीची मागणी होत आहे. यापूर्वीही सीएसकेवर बंदीची नामुष्की ओढवली होती.

चेन्नईचे आमदार एसपी वेंकटेश्वरन यांनी चेन्नई सुपर किंग्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, "सीएसके हा संघ चांगली कामगिरी करत आहे. पण या संघात तामिळनाडूमधील खेळाडूंचा समावेश नसून या संघावर बंदी घालायला हवी," अशी मागणी त्यांनी केली आहे. ते धर्मपुरीमधील आमदार असून ते पट्टली मक्कल काची या पक्षाचे नेते आहेत. ते पुढे म्हणाले की, "सीएसके हा संघ जाहिरात माध्यमातून कोट्यवधींचा नफा कमावतो. तसेच हा संघ तामिळनाडू राज्याचे प्रतिनिधित्व करतो. पण या संघात राज्याचे किती खेळाडू आहेत?" असा सवाल त्यांनी केला. "तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून त्यांना संघात जागा मिळत नाही. जर स्थानिक खेळाडूंनाच याचा फायदा होत नसेल, तर या संघावर बंदी घाला," अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in