क्रिकेटच्या मैदानात दादाचे पुनरागमन होणार; लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन-२ मध्ये खेळणार

गांगुलीने या सामन्याची तयारी सुरू केली असून तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
 क्रिकेटच्या मैदानात दादाचे पुनरागमन होणार; लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन-२ मध्ये खेळणार

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय ) अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. दादाने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामद्वारे लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन-२ मध्ये एक सामना खेळण्याची तयारी दर्शविली आहे. आगामी हंगाम भारतात आयोजित केला जाईल, असे अलीकडेच लेजेंड्स लीग क्रिकेटने जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना सौरव गांगुली पुन्हा खेळताना दिसणार आहे.

गांगुलीने या सामन्याची तयारी सुरू केली असून तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. गांगुलीने जिममधील स्वतःचे फोटो देखील पोस्ट केले आहेत आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या लीजेंड्स लीग क्रिकेट खेळत असल्याची पुष्टी केली आहे.

गांगुलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आझादी का अमृत महोत्सवासाठी निधी उभारण्यासाठी होणाऱ्या या सामन्यासाठी मी प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि महिला सशक्तीकरणासाठी लिजेंड्स लीग क्रिकेटच्या शीर्ष दिग्गजांसह लवकरच लिजेंड्स लीग क्रिकेट सुरू होणार आहे.

गांगुलीने ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in