
नवी दिल्ली : बीसीसीआयने सोमवारी यंदाच्या हंगामासाठी करारबद्ध केलेल्या महिला क्रिकेट खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यानुसार भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मन्धाना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्यासोबत बीसीसीआयने ‘ए’ श्रेणीचा सेंट्रल करार कायम ठेवला.
वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर, अष्टपैलू जेमिमाह रॉड्रिग्स, यष्टीरक्षक रिचा घोष आणि सलामीवीर शफाली वर्मा या ‘बी’ श्रेणीत कायम आहेत.
राजेश्वरी गायकवाडला यंदा ग्रेड ‘बी’मध्ये स्थान मिळाले नाही. युवा फिरकीपटू श्रेयांका पाटील, वेगवान गोलंदाज तितास संधू, अरुंधती रेड्डी, अष्टपैलू अमनज्योत कौर आणि यष्टीरक्षक उमा छेत्री यांच्यासोबत पहिल्यांदाज सेंट्रल करार करण्यात आला आहे. त्यांचा ‘सी’ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. यष्टीका भाटीया, राधा यादव, स्नेह राणआ आणि पूजा वस्त्राकर हे खेळाडूही या ग्रेडमध्ये आहेत.
मेघना सिंह, देविका वैद्य, सब्बिनेनी मेघना, अंजली सर्वानी आणि हर्लिन देओल यांना या करारांतून वगळण्यात आले आहे.