ICC Ranking : भारताचा सिराज ठरला नं. १; आयसीसी क्रमवारीत अव्वल, तर गिल सहाव्या स्थानावर

न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद सिराजने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आयसीसी क्रमवारीमध्ये (ICC Ranking) त्याला चांगलाच फायदा झाला आहे
ICC Ranking : भारताचा सिराज ठरला नं. १; आयसीसी क्रमवारीत अव्वल, तर गिल सहाव्या स्थानावर

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत उत्तम कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीमध्ये (ICC Ranking) याचा चांगलाच फायदा झाला. २८ वर्षीय सिराजने अनेक धुरंधरांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. २०१९मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सिराजने आपल्या गोलंदाजीत सातत्य ठेवत आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. तसेच, भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने सहाव्या स्थानावर झेप घेत आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप १०मध्ये प्रवेश केला आहे.

जानेवारी २०१९मध्ये सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. मात्र, यामध्ये त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली. यावेळी मात्र, त्याने संधी गमावली नाही. त्यानंतर त्याने २१ एकदिवसीय सामने खेळले असून २०.७३च्या सरासरीने ३८ विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसी क्रमवारीत त्याच्या नावावर ७२९ गुण आहेत. तर, त्याच्यामागे ऑस्ट्रेलिया गोलंदाज जोश हेजलवूड ७२७ गुणांसहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतेच सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ९ तर न्यूझीलंडवृद्ध झालेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २ सामने खेळाला आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत.

शुभमन गिल आयसीसी क्रमवारीत टॉप १०मध्ये

भारताचा नवा द्विशतकवीर शुभमन गिलनेदेखील आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने टॉप १०मध्ये प्रवेश करत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची जाहीर झाली असून यामध्येही अनेक उलटफेर पाहायला मिळाले. गिलने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७३.७६ची सरासरी आणि १०९.८० च्या स्ट्राइक रेटने १२५४ धावा केल्या आहेत. गिलने एक-दोन नव्हे तर तब्बल २० स्थानाची झेप घेतली. याआधी तो २६व्या स्थानावर होता. तर, विराट कोहलीची ७व्या स्थानावर घसरण झाली असून कर्णधार रोहित शर्मा हा नवव्या स्थानावर आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in