ICC Women's T20 World Cup : भारतीय महिलांचे बांगलादेशवर सहज वर्चस्व

महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्या गटात बांगलादेशचा ५ गडी व १९ चेंडू राखून पराभव केला.
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिलांचे बांगलादेशवर सहज वर्चस्व
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिलांचे बांगलादेशवर सहज वर्चस्व(Photo-X)
Published on

मँचेस्टर : महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्या गटात बांगलादेशचा ५ गडी व १९ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने ४ सामन्यांत तिसरा विजय नोंदवून दुसरे स्थान पक्के केले. आता रविवारी भारताची ऑस्ट्रेलियाशी गाठ पडेल. तो सामना जिंकणे भारताला अनिवार्य असेल. बांगलादेशने दिलेले १३७ धावांचे लक्ष्य भारताने १६.५ षटकांत पाच फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. शफालीने ३४ चेंडूंत ५३ धावांची खेळी साकारली.

क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा केलेल्या चुकांमुळे भारताला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात काहीसा संघर्ष करावा लागला, तरीही भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १३६ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय खेळाडूंनी चार झेल सोडल्यामुळे बांगलादेशला त्यांच्या डावात ही धावसंख्या उभारता आली.

बांगलादेशच्या डावात सलामीवीर जुवैरिया फर्दोसने ३३ धावांची, तर कर्णधार निगार सुलतानाने ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघींच्या योगदानामुळे बांगलादेशचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. भारतासाठी डावखुरी फिरकीपटू राधा यादवने प्रभावी गोलंदाजी केली. संघात पुनरागमन करणाऱ्या राधाने आपल्या चार षटकांच्या कोट्यात २८ धावा देत तीन बळी मिळवले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in